माजी खासदार प्रतापराव पाटील - चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

    25-Oct-2024
Total Views | 90
 
chikhalikar
 
मुंबई : ( Prataprao Patil-chikhalikar ) माजी खासदार प्रतापराव पाटील - चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
 
माजी खासदार प्रतापराव पाटील - चिखलीकर यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने त्यांचे लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून नावाची घोषणा करण्यात आली. शिवाय एबी फॉर्मही राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिला.
 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, आमदार इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे आदी उपस्थित होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

‘उदयपूर फाइल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, कन्हैयालाल हत्याकांडातील आरोपीची मागणी फेटाळली

उदयपूर फाइल्स कन्हैया लाल टेलर मर्डर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करत कन्हैया लाल हत्या प्रकरणातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात याचिका बुधवार, दि. ९ जुलै रोजी दाखल केली गेली. न्या. सुधांशू धुलिया आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मोहम्मद जावेद या आरोपीने असा दावा केला आहे की, या हत्येप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशावेळी जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्याचा प्रभाव खटल्यावर होऊ शकतो आणि परिणामी निष्पक्ष न्यायदानाच्या प्रक्रियेत बाधा आणू शकतो...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121