'आधार' हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी - केंद्र सरकार

मूडीजचा अहवाल नाकारला

    26-Sep-2023
Total Views | 83

aadhar card


नवी दिल्ली : अमेरिकन रेटिंग एजन्सीने आधारबाबत दिलेल्या वक्तव्यावर केंद्र सरकारने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. युआयडिएआय या आधार कार्ड जारी करणाऱ्या प्राधिकरणाने मूडीजचे दावे निराधार असल्याचे म्हटले असून आधार हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी असल्याचे म्हटले आहे. मूडीजने आधार कार्डशी जोडलेल्या लोकांची सुरक्षा आणि गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

मूडीजने आपल्या एका अहवालात म्हटले होते की, भारतासारख्या गरम देशात बायोमेट्रिक आधार प्रभावी नाही. उष्मा आणि आर्द्रतेत काम करणाऱ्या कामगारांसाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असेही मूडीजने म्हटले आहे.

मात्र, हे दावे निराधार असल्याचे सरकारने प्रत्युत्तर दिले. या अहवालात प्राथमिक किंवा दुय्यम डेटा किंवा संशोधनाचा उल्लेख नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. उष्णता आणि आर्द्रतेच्या दाव्याला उत्तर देताना, सरकारने सांगितले की बायोमेट्रिक्स चेहरा आणि बुबुळांच्या माध्यमातून देखील संपर्करहित पद्धतीने केले जाऊ शकतात.

सरकारच्या म्हणण्यानुसार, “कदाचित संशोधकांना हे माहित नसेल की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या डेटाबेसमध्ये आधारची सीडिंग अशा प्रकारे केली गेली होती की त्यांना प्रमाणीकृत करण्यासाठी बायोमेट्रिक्स वापरण्याची आवश्यकता नाही. "कामगारांना पेमेंट देखील थेट त्यांच्या खात्यात केले जाते आणि तेथे देखील, बायोमेट्रिक्सची आवश्यकता नाही." सुरक्षेबाबत सरकारने म्हटले आहे की, आजपर्यंत कोणीही आधार डेटाबेसमध्ये प्रवेश करू शकलेले नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121