ठाणे : राज्यातील महायुती सरकारमुळे गोरगरीब जनतेला सणासुदीत 'आनंदाचा शिधा' रूपाने मदतीचा हात मिळाला आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारच्यावतीने वाजवी दरात 'आनंदाचा शिधा' वाटप सुरू झाले आहे. भाजपाचे आमदार कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रमुख अॅड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते कोपरीत या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी पार पडला. यावेळी शिधावाटप दुकानात नागरीकांना शिधावाटप करण्यात आले.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजने अंतर्गत सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सर्वसामान्यांचे सण आनंदात जाण्यासाठी "आनंदाचा शिधा" देण्यात येत असुन गणेशोत्सवानिमित्त शहरातील सर्व शिधावाटप दुकानांमधून आनंदाचा शिधा वाटप सुरू झाले आहे. त्या अंतर्गत कोपरी परिसरातील नागरिकांना आनंदाचा शिधावाटप करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला आ.निरंजन डावखरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, कोपरी- पाचपाखाडी विधानसभा संयोजक, भाजपा स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, उपाध्यक्ष राजेश गाडे, शहर चिटणीस श्रुतिका मोरेकर - कोळी, कोपरी मंडळ अध्यक्ष शिवाजी रासकर, अमरीश ठाणेकर, प्रमोद चव्हाण, सुचित्रा भोईर, गणेश भोईर, सचिन कुटे, शेखर निकम, दिगंबर रांधे आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाबद्दल ठाण्यातील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.