‘भारतीय विरागिनी’ हे अरुणाताई ढेरे यांनी लिहिलेले भारताचा गौरवास्पद, आध्यात्मिक वारसा सांगणारे अमूल्य असे पुस्तक. पुरुष संतांच्या बरोबरीने भारतात अनेक वैरागी स्त्रिया पण संत झाल्या. परंतु, स्त्री संतांची चरित्रे फारशी लिहिली गेली नाहीत. त्यांच्या संप्रदायांनीसुद्धा त्यांच्या नोंदी ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले नाही, ही खंत अरुणाताई मांडतात. ती कमतरता भरून काढण्यात, हे पुस्तक मदत करणारे ठरेल यात शंका नाही.