अजित पवारांचा फोटो पाहताच सुप्रिया सुळे झाल्या भावूक....

    11-Sep-2023
Total Views |
 
supriya and ajit
 
 
मुंबई : झी मराठी वाहिनीवरील ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवधुत गुप्ते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असून आत्तापर्यंत त्यांनी अनेक कलाकार, राजकारणी यांना बोलते केले आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो प्रदर्शित झाला त्यात खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो पाहून भावूक झालेल्या दिसल्या. दरम्यान, आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
 
‘खुप्ते तिथे गुप्ते’च्या या नव्या भागात अवधूत गुप्ते यांच्या खुपणाऱ्या प्रश्नांना सुप्रिया सुळे बिन्धास्तपणे सामोऱ्या जाणार आहेत. अवधुतच्या प्रश्नांना थेट उत्तरं देताना अजित पवारांचा फोटो पाहून सुप्रिया सुळे भावू झालेल्या देखील दिसल्या आहेत. नुकतंच या नव्या भागाचा प्रोमो झीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
 
यावरुन स्पष्ट होते की, अजित पवार यांच्या पक्ष सोडून जाण्यामुळे सुप्रिया सुळे भावूक झाल्या आहेत. दूर गेलेल्या लोकांच्या आठवणी या कधीच आपली साथ सोडत नाही हे स्पष्ट होत आहे. या दरम्यान सुप्रिया सुळे चांगल्याच भावूक झाल्या होत्या. यावर त्या काय उत्तर देणार हे कार्यक्रमाच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळणार आहे. नवा एपिसोड आल्यावर समजेलच. येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी हा एपिसोड ‘झी मराठी’वर पाहता येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.