केवळ पक्षी निरीक्षण करून फायदा नाही, तर त्या माहितीचा जगभरातील शास्त्रज्ञांना फायदा होऊन त्याचा शास्त्रीय आणि संशोधनात्मक कामात उपयोग व्हावा, या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरलेल्या काही ऑनलाईन अॅप्सविषयी...
पक्ष्यांचे निरीक्षण करू लागलो खरे. पण, हे पक्षी कुठे आणि कधी आढळले, याच्या नोंदी ठेवणे फार महत्त्वाचे असते. या नोंदी म्हणजेच ‘रेकॉर्ड किपिंग’चा भाग पक्षी निरीक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. या नोंदींमुळे इतर पक्षी निरीक्षक आणि संशोधकांना या माहितीचा फायदा होतो आणि त्यामुळे डॉक्युमेंटेशन एक महत्त्वाचा हातभार ही लागतो. ‘रेकॉर्ड किपिंग’बद्दल आजच्या लेखात समजून घेऊ. पक्षीनिरीक्षणाच्या अभ्यासात मी माझ्या पक्षीनिरीक्षणाच्या शास्त्रीय नोंदी ‘शइळीव’ या जागतिक व्यासपीठ असलेल्या अॅपवर करत असतो. शइळीव उेीपशश्रश्र श्ररल ेष जीपळींहेश्रेसू निर्मित एक भ्रमणध्वनीवरच चालु शकणारे अॅप्लिकेशन आहे. सामान्य माणसाला चालता फिरता सहजच पक्षी दिसताच त्या पक्ष्यांच्या नोंदी या अॅपवर करता येतात. इतर कोणत्याही अॅपप्रमाणे यावरही आपण आपले खाते (अकाऊंट) उघडायचे असते. हे अॅप ‘अँड्रॉईड’ आणि ‘आयओएस’या दोन्ही सिस्टममध्ये कार्य करू शकते.
मोबाईलवर हे अॅप सुरू करताच आपल्याला काही महत्त्वाच्या सेटिंग करावयाच्या आहेत. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे सेटिंग आहे पोर्टलचे, जे आपल्याला भारतीय नात्याने शइळीव खपवळर असं ठेवायचे असते. सरावाने शइळीव चे अॅप आणि संकेतस्थळ कसे हाताळायचे याबाबत आपसुकच माहिती होत जाते.
शइळीव या अॅपवर आपल्याला जगभरातील कोणत्याही जागांवरील पक्षीनिरीक्षणाच्या नोंदी ठेवता येतात आणि या नोंदीचा उपयोग पुढे जाऊन पक्षीसंवर्धनासाठी होऊ शकतो. विनाशुल्क जागतिक व्यासपीठावरील हे अॅप जगभरातील पक्षी अभ्यासक वापरत आहेत आणि त्यावर पक्षीप्रजातींची नावे, संख्या, छायाचित्रे, चलचित्रे, आवाजाचे नमुने इत्यादी माहिती समाविष्ट करत आहेत. यावर पक्षीप्रजातींची मराठीतील प्रमाण नावेसुद्धा समाविष्ट करण्यात आली आहेत, तर असे हे शइळीव अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ परिसर पक्षीनिरीक्षकाचे अभ्यासासाठीचे उत्तम टुल ठरत आहे. यातून पक्षीनिरीक्षकाला कोणती पक्षीप्रजाती, किती संख्येने, कोणत्या जागेवर पाहिली आणि त्या पक्षीप्रजातींचे छायाचित्रे, चलचित्रे, आवाजाचे नमुने इ. टाकता येतात. या ऐतिहासिक नोंदीचा उपयोग भविष्यात पक्षीसंवर्धनासाठी, पक्षीस्थलांतराच्या अभ्यासासाठी तसेच अधिवासाबद्दल माहिती घेण्यासाठी ही होऊ शकतो.
भारतीय पक्ष्यांची सद्यःस्थिती दर्शविणारा अहवाल - नुकताच प्रसिद्ध झाला. हा अहवाल म्हणजे याच संकेतस्थळावरील भारतीय पक्षीनिरीक्षकांनी अनेक वर्षे केलेल्या नोंदीचे फलित आहे. पक्ष्यांच्या नोंदी करायच्या म्हणजे पक्ष्यांची प्राथमिक तोंडओळख होणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे हे अॅप तुम्हाला चशीश्रळप इळीव खऊ यावर त्याची माहितीसुद्धा करून देते. याशिवाय यासारखे अनेक अॅप्लिकेशन वापरून आपण आपल्या परिसरातील पक्षीअभ्यासातील अनुभवाला बळकटी देऊ शकतो. अशा पद्धतीने पक्ष्यांच्या शइळीव या सामान्य माणसांच्या व्यासपीठाचा पक्षी अभ्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. आपण निवडलेल्या पक्षीअभ्यासाच्या परिसरातून आढळलेल्या पक्ष्यांचे फोटो अशा प्रकारच्या माध्यमांवरुन सर्वांसाठी ज्ञानाचं विद्यापीठ सुरू करता येऊ शकेल.
- लक्ष्मीकांत नेवे