जागतिक जैवइंधन आघाडी जगासाठी मार्गदर्शक ठरणार

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन

    11-Sep-2023
Total Views |

herdeepsingh puri


नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील एक नवीन मार्ग दाखविणारी ठरेल, असे मत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.


केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर अनेक संदेशांची एक मालिका सामायिक केली आहे. वसुधैव कुटुंबकम या मंत्राचे अनुसरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या प्रयत्नांमुळे संपूर्ण जगाचे पेट्रोल आणि डिझेलवरचं अवलंबित्व नक्कीच कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते पुढे म्हणाले, जागतिक ऊर्जा क्षेत्राच्या इतिहासात नोंद होईल अशी जागतिक जैवइंधन आघाडी स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जी २० परिषदेच्या अनुषंगाने केली. 19 राष्ट्रे आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांनी या आघाडीत सामील होण्यासाठी आधीच संमती दर्शवली आहे.


जैवइंधनाचा वापर सुलभ करण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग यांची आघाडी विकसित करण्यासाठी जागतिक जैवइंधन आघाडी हा भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. जैवइंधन विकासाला चालना देण्यासाठी जैवइंधनाचे सर्वात मोठे ग्राहक आणि उत्पादकांना एकत्र आणणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. जैवइंधनाला ऊर्जा संक्रमणाची गुरुकिल्ली म्हणून स्थान देणे आणि त्याद्वारे रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढीस हातभार लावणे हा देखील यामागील उद्देश असल्याचे केंद्रीय मंत्री पुरी यांनी म्हटले आहे.


ऊर्जा चतुष्कोनास मिळणार बळ
जी 20 राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (आयईए), आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (आयसीएओ), जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईओ) आणि जागतिक एलपीजी असोसिएशन यासारख्या ऊर्जा क्षेत्रातील जागतिक स्तरावरील संस्थांनी पाठबळ या आघाडीस पाठबळ दिले आहे. त्यामुळे चतुष्कोनत ही आघाडी महत्वाची भूमिका बजावेल. यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत प्राप्त होऊन त्यांना ‘अन्नदाता ते उर्जादाता’ अशी नवी ओळख मिळेल, असेही केंद्रीय मंत्री पुरी यांनी यावेळी नमूद केले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.