यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमासाठी मुदतवाढ
२० ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज
11-Aug-2023
Total Views | 383
ठाणे : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या विद्यापीठातर्फे आता प्रवेशाची मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी www.ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत. तसेच २० ऑगस्टपर्यंत विद्यार्थी हे अर्ज करु शकणार आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात. राज्यातील कारागृहातील बंदिवान, अंध व्यक्ती यांना मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश आहे. तसेच अनुसूचित जाती, जमातीसाठी १९० रूपयात अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येऊ शकेल.बीए, बीकॉम तसेच पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना वयाची अट असणार नाही.
विशेष म्हणजे य़शवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विद्यार्थ्याना ड्युअल पदवी, पदविका देखील घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पत्रकारीता डिग्री व डिप्वोमा साठी प्रवेश घेताना विद्यापीठाच्या वेबसाईटवर जर्नालिझम डिप्लोमा साठी MCJ ३०३ व पदवीसाठी G-१५ हा संकेतांक आहे. यासोबत अभ्यास क्रेंद्र कोड ३५३१२ भरायचा आहे.
हा प्रवेश ऑनलाईन पध्दतीने घेता येणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण सर्टिफिकेट, आधार कार्ड व फोटो सोबत जोडायचा आहे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी व ऑफलाईन प्रवेशासाठी आनंद विश्व गुरूकुल, रघुनाथ नगर. तीनहात नाका जंक्शन, ठाणे पश्चिम येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ वेळेत आकाश ढवळ ८२९१० ९२५११ यांना संपर्क करावा.