भाजपाच्या समर्थनात भिंतीवर घोषणा लिहिल्या म्हणून कट्टरपंथीयांकडून मुस्लिम महिलेला मारहाण

    01-Aug-2023
Total Views | 111
jaipur 
 
जयपूर : राजस्थानमधील जयपूर शहरातून मॉब लिंचिंगचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम समाजातील एका महिलेवर तिच्या मुस्लिम पुरुषांच्या जमावाने हल्ला केला. त्या महिलेने आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ काही घोषणा लिहिल्या होत्या.
 
 
यावर नाराज झालेल्या कट्टरपंथीयांनी त्या महिलेवर हल्ला केला. घाबरलेल्या महिलेने स्वत:ला घरात कोंडून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र जमावाने तिला घरा बाहेर ओढले. त्यांनी तिला जमिनीवर लोळवले आणि बेदम मारहाण केली. सुदैवाने, एका पोलीस महिलेने हस्तक्षेप करून तिचे संरक्षण केल्याने तिला वाचवण्यात आले.
 
ही घटना राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये घडली आहे. ही घटना समोर येताच राजस्थानच्या गेहलोत सरकारवर टीका होत आहे. पोलीस महिलेने हस्तक्षेप केला नसता तर त्या महिलेचा जीव गेला असता. व्हीडिओमध्ये दिसत आहे की, ती महिला मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121