"अंदाज कुछ और है सोचनेका, मुझे शौक है रास्ता बनाने का"
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा
26-May-2023
Total Views | 219
मुंबई : "अंदाज कुछ और है सोचनेका, मुझे शौक है रास्ता बनाने का" असा शेर देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आलं. शिर्डी ते भरवीर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या महामार्गाच्या लोकार्पणावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेरो-शायरी केली.
फडणवीस म्हणाले, "लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. साईबाबांसमोर नतमस्तक होतो. येत्या 6 महिन्यांमध्ये हा महामार्ग पूर्ण होईल. शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते तेव्हा आम्ही हे स्वप्न बघितलं. मागास भागाचा विकास करण्यासाठी हा महामार्ग आहे. अनेकांना हे स्वप्न वाटायचं. मला विश्वास होता, रेकॉर्ड टाईममध्ये हे काम पूर्ण होईल. अंदाज कुछ अलग है मेरा, किसको मंजिल पाने का शौक हे, मुझे रास्ता बनाने का!" असा शेर देवेंद्र फडणवीस यांनी केला, त्यामुळे फडणवीस यांच्या या शायरीचा रोख नेमका कुणाकडे होता? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
देशातील विक्रम आहे, ७०१ किमी जमीन ९ महिन्यात संपादन केली. अधिराऱ्यांनी यात प्रचंड मेहनत केली, असे फडणवीस म्हणाले. अनेक लोकांनी या महामार्गाला विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत महामार्गाला विरोध केला. शरद पवार यांनी सांगितलं की हे शक्य नाही. ज्या गावात विरोधकांनी सभा घेऊन सांगितलं की हा मार्ग होऊ देणार नाही. त्याच गावात जाऊन एकनाथ शिंदे यांनी लोक जमीन द्यायला तयार आहेत, अशाप्रकारचे पत्र जमा केले. त्या गावात पहिली रजिस्ट्री केली. असं फडणवीस म्हणाले.