‘जननी’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

    25-May-2023
Total Views |

janani 
 
मुंबई : ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच लॉन्च केलेल्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मने दर आठवड्याला नवीन कॉन्टेन्ट प्रेक्षकांच्या भेटीला आणत ‘जननी’ हा बहुचर्चित चित्रपट २९ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात मातृदिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित झाले होते.
 
जननी या चित्रपटाची कथा विचारप्रवर्तक आणि भावनिकरित्या मातृत्वाच्या नातेसंबंध, कौटुंबिक बंध आणि वैयक्तिक वाढ यांच्या गुंतागुंतीचे वर्णन करून मांडण्यात आली आहे. आईच्या आपल्या मुलांवरील प्रेमाचा आणि आपल्या मुलांच्या सुखासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या ‘जननी’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, मोहनीश बहल, आयेशा झुल्का, अमन वर्मा, विनीत रैना आणि सोनिका हंडा या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाच दिग्दर्शन चंदर एच. बहल यांनी केलं आहे, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता हाच चित्रपट संपूर्णपणे मराठी भाषेत प्रेक्षकांना अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटीवर पाहता येणार आहे.
 
‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असलेल्या ‘जननी’ या बहुचर्चित चित्रपटाविषयी बोलताना अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले “कलाकारांची उत्तम फळी लाभलेला आमचा हा चित्रपट मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. तत्कालीन परिस्थितीत सरोगसी सारख्या विषयावर प्रकाश टाकणारा विषय आम्ही ‘जननी’ चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’च्या माध्यमातून हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाता येणार असल्याचा आम्हाला आनंद आहे.”
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.