महाराष्ट्र भाजपात संघटनात्मक फेरबदलाचे वारे!

    25-May-2023
Total Views |
 
bjp
 
 
मुंबई : भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून संघटनात्मक पातळीवर सर्व पदाधिकाऱ्यांची फेरनियुक्ती केली जाणार आहे. तर राज्यातील ७० टक्के जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार आहेत.
 
कार्यकारिणीच्या पार्श्वभूमीवर संघटनेतही तख्तापलट होणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिले आहेत. राज्य कार्यकारिणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सर्व जिल्हा समन्वयकांना पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे आदेश दिलेत. 
 
जिल्हाध्यक्ष बदलत असताना भाजप तरुण पदाधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर संधी देणार आहे. तसंच जुन्या जिल्हाध्यक्षांच्या अनुभवानुसार लोकसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती होणार असल्याचे भाजपाकडुन सांगण्यात आले आहे. २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संघटनात्मक बदल केले जात आहेत. जिल्ह्याध्यक्ष बदलानंतर जुन्या जिल्हाध्यक्षांकडे लोकसभा मतदारसंघ बांधणीची जबाबदारी दिली जाणार आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.