आधी म्हणाला धर्मांतर कर! आता रस्त्यावर आणलंयं! केरला स्टोरी नाही ही खरी स्टोरी आहे!

    24-May-2023
Total Views |
 
Love jihad
 
 
मुंबई : आधी धर्मांतर कर असे सांगुन एका हिंदु मुलीला फसवल्याची घटना घडली आहे. या मुस्लीम तरुणाने लग्नाच्या कारणाने तिला दुबईला घेऊन गेला. ४ वर्षे दुबईत एकत्र राहिल्यानंतर कामाचे कारण सांगुन तो एकटाच परतला. त्या मुलाने मला रस्त्यावर आणलंयं. असा दावा ती हिंदु मुलगी करत आहे. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्या मुस्लीम मुलाला शोधत ती मुलगी दुबईहुन आली. माहितीप्रमाणे ती त्याच्या घरी गेल्यानंतर तिला कोणीही घरात घेतला नाही. घराचा दरवाजा ही उघडण्यात आला नाही. मला मुस्लीम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा वारंवार दावा, ती मुलगी करत आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.