कोल्हापूरात सुपर शॉप दुकानाला आग ; आगीत चार दुकाने जळून खाक

    23-May-2023
Total Views | 49
kolhapur shivaji chowk

कोल्हापूर
: शिवाजी चौक परिसरातील सुपर शॉप दुकानाला आग लागली. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अर्धा एक तासापासून अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत. सुपर दुकानासोबतच आणखी चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. आगीत दुकानातील सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी याच दुकानाला आग लागली होती. आता परत आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. त्याचबरोबर जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121