एनआयए करणार लंडनमधील खलिस्तानवाद्यांची चौकशी

    23-May-2023
Total Views |
NIA investigate Khalistanists in London

नवी दिल्ली
: खलिस्तान समर्थक अमृतपालला भारतात फरारी घोषित केल्याच्या निषेधार्थ लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी केलेला हल्ला आणि देशविरोधी घोषणाबाजीची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक लंडन येथे दाखल झाले आहे.

एनआयएचे हे पथक लंडनमधील भारतीय दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी केलेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करणार आहे. त्याचप्रमाणा दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हेदेखील एनआयए सुनिश्चित करणार आहे. या पथकामध्ये तीन चार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसाप दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आली होती.

दरम्यान, अमृतपालसिंग नामक खलिस्तानवाद्याने पंजाबमध्ये खलिस्तान चळवळीस पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने त्याने पोलीस, सरकार आणि देशाविरुद्ध हिंसक कारस्थानांना प्रारंभ केला होता. हे लक्षात येताच पंजाब पोलिसांनी त्यांच्याविरोधात धरपकड मोहिम सुरू केली होती. त्यामध्ये अमृतपालला अटक करून सध्या त्यास आसाम कारागृहात ठेवले आहे. मात्र, अमृतपालविरोधात कारवाई सुरू होताच परदेशातील खलिस्तानवाद्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयास लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरोधात भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदविला होता.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.