ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

    22-May-2023
Total Views |
Prithviraj Chavan on Mahavikas Aghadi

मुंबई
: महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ आहे, असे विधान अजित पवारांनी केले होते. त्यावर आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य चुकीचे नाही. नेते असे उत्साहवर्धक विधान करत असतात. आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ नंबरचा पक्ष आहे. काँगेस २ तर ठाकरे गट शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दरम्यान २ हजाराची नोट फक्त काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जात होती, असे ही चव्हाण म्हणाले आहेत. मात्र त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही. परंतु लोकांना त्रास होईल.मात्र या सगळ्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत होणार असल्याचे ही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.