आरबीआयचा मोठा निर्णय ; कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द
21-May-2023
Total Views | 1921
मुंबई : आरबीआयने दि. १९ मे रोजी २ हजारांच्या नोटांचे वितरण बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे छपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. २ हजारांच्या नोटाबंदीमुळे ५०० च्या नोटांच्या अतिरिक्त छपाई करता देवास येथील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ११-११ तास काम करण्याचे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांसमोर असल्याचे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ११ तासांच्या दोन शिफ्ट करून काम करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण २२ तास काम चालणार आहे. सध्या देवास येथील नोटप्रेसमध्ये १,१०० कर्मचारी कार्यरत आहेत.
दरम्यान, आरबीआयने शुक्रवारी दि. १९ मे रोजी २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ३० सप्टेंबरपर्यंत २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश आरबीआयने नागरिकांना दिले होते. क्लीन नोट पॅलिसी अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे काळ्या पैशांची साठेबाजी करणाऱ्यांवर प्रहार करण्यात आला होता. २०१८-१९ पासूनच २ हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.