मविआची स्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’ : नारायण राणे

    21-May-2023
Total Views |
Narayan Rane on Mahavikas Aghadi

मुंबई : महाविकास आघाडीत आतापासूनच लोकसभेच्या जागावाटपावरून वाद सुरु झाले असून त्यांची अवस्था म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे. आपले राजकीय मूल्य किती? आपल्या पक्षाचे बळ किती राहिले आहे? याचा अंदाज न घेता विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, अशी टीका 'दै.मुंबई तरूण भारत' मुलाखत देताना नारायण राणेंनी केली आहे.

महाराष्ट्रतील राजकीय परिस्थिती बद्दल बोलताना राणे म्हणाले की, विरोधक जे वातावरण निर्माण करू पाहत आहेत, त्यामागे सत्ता गेल्यामुळे आलेले नैराश्य आणि कमी होत जाणारा लोकांचा पाठिंबा, झालेले खच्चीकरण यामुळे महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करून सरकारला बदनाम केले जात आहे. पण या बदनामीमुळे भाजपवर काहीही परिणाम होणार नाही.आज देशात भाजपचे 302 खासदार आहेत, तर राज्यात शिवसेना-भाजपचे बहुमताचे सुरक्षित सरकार असून, हे सरकार 2024 पर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होणार हा विश्वास आहे. सरकारच्या स्थिरतेविषयी टीकाटिप्पणी करणारी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मुळात सरकार आणि फडणवीस, शिंदेंवर आरोप करणार्‍यांचे आपल्या मतदारसंघात आणि एकूण महाराष्ट्रात काम किती आहे, याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे, असे ही राणे म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.