तुमचं काय सगळं उध्वस्त झालं आहे; दरेकरांचा ठाकरेंना टोला!

    19-May-2023
Total Views |
 
Praveen Darekar
 
 
मुंबई : तुमचं काय सगळं उध्वस्त झालं आहे. आपल्यात काय राहील हे संजय राऊत यांनी बघावं. बेगामी शादी मे अब्दुला दिवाना! अशी त्यांची परिस्थिती आहे. संजय राऊत आणि ठाकरे गटाने काँग्रेसमध्ये तरी व्हिलीन व्हा, काँग्रेसला कुठे यश मिळालं की नाचायला कोण तर संजय राऊत तयार असतात. असं म्हणत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
 
यावेळी मोदी @ ९ अभियानावर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. "३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण होतायत त्या पार्श्वभूमीवर अभियान राबवले जात आहेत. 48 लोकसभा मतदार संघात विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये 48 जाहिर सभा होतील, यामध्ये केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री सहभागी असतील. समाजातील प्रभावी लोक देखील यामध्ये सहभागी असतील."
 
"श्वेता शालिनी यांच्याकडे विशेष जबाबदारी आहे, समाजाला दिशा देण्याच काम करतात त्यांचे कार्यक्रम होणार आहेत, विविध संमेलन पत्रकार परिषद होतील. विधानसभेमध्ये देखील कार्यक्रम घेतले जातील. लोकसभा क्षेत्रात जी काम केली आहेत त्या प्रकल्पाची जबाबदारी आमदार राणा जगजीत सिंग यांच्यावर आहे. 30 मे रोजी याची सुरवात होणार आहे, मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत याची सुरवात होणार आहे." असं दरेकर म्हणाले.
 
"21 जून हा जागतिक योग दिन साजरा केला जातो. या दिवशी सर्वीकडे कार्यक्रम आयोजित केले जातील याची जबाबदारी ही चित्रा वाघ यांच्याकडे असेल. 23 तारखेला मोदीजी जनतेशी आणि कार्यकर्त्याशी संवाद साधतील. 20 जून ते 30 जून पर्यत संपर्क अभियान असणार आहे याची जबाबदारी श्रीकांत भारतीय यांच्यावर असणार आहे. हे अभियान व्यवस्थित पार पडण्याची जबाबदारी सर्वाना दिली आहे. काम करायच आहे अशा सूचना जेपी नड्डा जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ती पार पाडतील." अशी कार्यक्रमाची माहिती दरेकरांनी यावेळी दिली.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.