आपणही अजमेरला चादर चढवायला जातो!

- त्र्यंबकेश्वर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

    19-May-2023
Total Views | 114
 
Ajit pawar
 
 
मुंबई : आपणही अजमेरला चादर चढवायला जात असतो. त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला इथं घडलेला प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. ह्या घटना घडू नयेत. अशा घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी आहे. कुणी भावनिक मुद्दा उपस्थित करुन जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण केला तर महाराष्ट्रातील पुरोगामी जनता ते कदापी सहन करणान नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.
 
अजित पवार म्हणाले, "त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत काही संघटना समोर आल्या आहेत. कोणी तिथं गौमुत्र शिंपडले, कुणाला काय शिंपडायचं आहे ते शिंपडा. तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदान राहतात. आपणनही अजमेरला चादर चढवायला जात असतो. त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक लोकांनी, आमदरांनी मला फोन करुन सांगितले. ती शंभर वर्षाची परंपरा आहे. अशाप्रकारच्या गोष्टी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन तेढ निर्माण केला जातोय, हे ताबोडतोब थांबवले पाहीजे. विकासकामांवर मते मागा. धार्मिक तेढ निर्माण करु नका." असं अजित पवार म्हणाले.
 
पुढे विकासकामांबद्दल बोलताना ते म्हणाले, "आमदारांना कमी निधी देऊन चालणार नाही. आमदारांच्या निधी वाटपात भेदभाव नको. राज्यात कंत्राटदारांची एक लाख कोटीची बिलं थकीत आहेत. कामांना स्थगिती दिल्याबाबत चंदक्रांत पाटलांशी चर्चा करणार. विरोधी पक्ष म्हणून सलोखा राखण्यासाठी मदत करण्याची आमची तयारी आहे. जनतेने पण हे पहावं. महागाईचा, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, उष्माघात, अवकाळी पाऊस यातून जो दिलासा द्यायला पाहिजे होता, ती अंमलबजावणी अद्याप झाली नाही." अशी भुमिका अजित पवारांनी मांडली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121