शिंदे-ठाकरे गटात राडा! उद्धव, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे ठाण्यात जाणार

    04-Apr-2023
Total Views | 123

Roshani Shinde


Photo - रोशनी शिंदे 

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना रोशनी शिंदेच्या कासरवडवली येथील ऑफिसमधुन सुटण्याच्या वेळी तिच्यावर शिंदे गटाच्या २० महिलांनी मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात येत आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल शिंदे गटावर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात रोशनी शिंदेंची भेट घेण्यासाठी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे ठाण्याला जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
 
घोडबंदरच्या कासारवडवली भागात ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर कार्यालयात शिरून काही महिलांनी हल्ला केल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
 
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या घोडबंदर भागातील युवती सेनेच्या पदाधिकारी आहेत. येथील एका खासगी कंपनीत त्या काम करतात. कार्यालयात असताना सोमवारी रात्री काही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाले आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप रोशनी शिंदे तसेच ठाकरे गटाकडून केला जात आहे.
या प्रकारामुळे ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह कासारवडवली पोलीस ठाण्याबाहेर जमून ठिय्या मांडला. तसेच हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच घोषणाबाजी केली. रोशनी यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. परंतु मंगळवारी सकाळपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
 
या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून टिकेची झोड उठविली जात आहे. आमदार जितेंद्र आव्डाड यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिसांच्या कारभारावर टिका केली आहे. ‘ठाकरे गटाची रोषणी शिंदे हिला ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण, मला खात्री आहे काही होणार नाही. न्यायाची अपेक्षा सोडली. सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे .. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात … विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे .. वरुण म्हणजे? असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तर खासदार राजन विचारे यांनी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून मारहाण करण्याचा पोलिसांनीच यांना परवाना दिला आहे का? असा प्रश्न विचारला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121