आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त साजिद नाडियाडवाला यांनी घेतली 100 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

    09-Mar-2023
Total Views | 59

nadiyavala 
 
मुंबई : ८ मार्च रोजी जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. अशातच, या विशेष प्रसंगी, साजिद नाडियाडवाला यांनी 100 मुलींच्या शिक्षणासाठी पैसे देऊन त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट ऑफिसमध्ये दरवर्षी महिला दिन साजरा केला जातो. अशातच, या वर्षीचे सेलिब्रेशन आणखी खास बनवत त्यांनी आपल्या समाजातील महिलांना सक्षम बनवण्याचे काम हाती घेतले असून, आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या नावाने 100 मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले आहे.
 
साजिद नाडियाडवाला नेहमीच आपल्या ऑफिसमधील प्रत्येक महिला एम्प्लॉयीला सपोर्ट करतात आणि त्यांच्या नावाने 5 मुलींना शिक्षण देतील. या कंपनीमध्ये अनेक प्रतिभावान महिला कर्मचारी काम करतात आणि शिक्षणातून त्यांनी आयुष्यात टप्पे गाठले आहेत, असा महिलांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना सक्षम करणे योग्य ठरेल. तसेच, त्यांनी नन्ही कली या प्रोजेक्टशी हातमिळवणी केली आहे जे संपूर्ण भारतातील १०० मुलींना समर्पितपणे शिक्षण देईल. साजिद नाडियाडवाला यांचा हा उपक्रम महिलांना सक्षम करत त्यांची शिक्षणाची स्वप्ने साकार करण्यासाठी आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121