अभिषेक सिंग आणि हार्डी संधू यांचे नवे गाणे

    28-Mar-2023
Total Views | 45

sandhu 
 
मुंबई : अभिनेता अभिषेक सिंग आता पुन्हा एकदा संगीत प्रेमींना प्रभावित करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अभिषेक सिंग यांनी एका गाण्यासाठी म्युझिक मेस्ट्रो हार्डी संधू शी हातमिळवणी केली आहे. 'याद आती है'असे या गाण्याचे नाव असून हे गाणे प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारे आहे. या गाण्यात अभिषेक डॅशिंग अवतारात दिसत आहे. तसेच, अभिषेक सिंगने म्युझिक व्हिडिओजमध्ये आपल्या उपस्थितीसह सर्वांना वेड लावले असून, या लेटेस्ट नंबरसह, त्यांची जादू पुन्हा पाहायला मिळणार आहे.
 
अभिषेक सिंगने आपल्या म्युझिक व्हिडिओंसह व्ह्यूअरशिपचे रेकॉर्ड बनवत आपली क्षमता सिद्ध केली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांच्या उत्तम व्यक्तिमत्वाला आणि उत्कृष्ट अभिनय कौशल्याला जाते, ज्यामुळे ते प्रेक्षकांशी लगेच जोडले जातात. तसेच, 'याद आती है'या गण्यामध्ये त्यांनी भारतीय म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय नावांपैकी एक असलेल्या हार्डी संधूसोबत काम केले आहे. अशातच, आयएएस (IAS) अधिकारी अभिषेक यांना मनोरंजनच्या दुनियेत यशाची पायरी चढताना पाहणे आनंदाची बाब आहे. दरम्यान, अभिषेक निःसंशयपणे देशातील टॉप रेटेड म्युझिक व्हिडिओंमध्ये वारंवार प्रदर्शित होणारे तसेच सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांपैकी एक बनले आहेत.
 
अशातच, 'याद आती है'या गाण्यातील हार्डीचा मधुर आवाज आणि अभिषेक सिंगच्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने हे गाणे निश्चितपणे चार्टबस्टर बनते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121