राज ठाकरेंनी दिलेली स्क्रीप्ट वाचली : उद्धव ठाकरे

    23-Mar-2023
Total Views | 153

arrest warrant against Raj Thackeray
 
 
मुंबई : "वाचून दिलेली स्क्रिप्ट त्यांनी वाचली दुसरं काहीही केलेलं नाही.", असा प्रहार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेवर उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुंबईतील माहिमची समुद्रातील मजार हटवल्याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आले होते. तेव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
 
ते म्हणाले, "ती मजार इतकी वर्षे तिथे होती. त्यांच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक तिथे होते. त्यापूर्वीपासूनचे बांधकाम होते. जशी स्क्रीप्ट आली तशी त्यांनी वाचून दाखविली", अशी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, "
माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?", असा प्रश्न त्यांनी विचारला.
 
"माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल.", असा इशारा त्यांनी दिला होता. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच माहिमच्या या जागेची पोलीसांनी पाहणी केली. गुरुवार, दि. २३ मार्च रोजी पोलीसांनी ही बेकायदा मजार आणि अन्य बांधकाम हटवले.
अग्रलेख
जरुर वाचा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, दि. 1 जून रोजी नाशिक दौर्‍यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. यावेळी कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन करण्याच्या उद्देशाने सिंहस्थ प्राधिकरणातील अधिकारी व सदस्यांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर पेशवेकाळापासून वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करणारे वैष्णव व शैव आखाड्यांचे प्रमुख कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने प्रथमच नाशिकमध्ये एकत्र येणार ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121