बीड :भाजप नेत्या पंकजा मुंडे आगामी विधानसभेच्या २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी बीड जिल्ह्यात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, बूथ सशक्तीकरण, जिल्हा प्रशिक्षण वर्ग व जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांशी संवाद साधत आहेत.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगतात, “सबका साथ सबका विकास, सबका विश्वास, नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री असले तरी ते देशातील प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीच्या प्रचाराला जातात. जेव्हा ते प्रचाराला जातात तेव्हा ते संघटना म्हणून जात असतात. जेव्हा ते निर्णय घेतात. तेव्हा ते देशाचा प्रथम नागरिक म्हणून निर्णय घेत असतात. असा नियम आमदार, खासदारांना देखील असला पाहिजे,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.मला केंद्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी सचिव म्हणून बैठक घेते तेव्हा मंचावरुन मोदीजी एकही मिनिट उठत नाहीत. पुर्णवेळ ते बैठकीत लक्ष देतात, असेही मुंडे यांनी या वेळी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.