राहुल गांधींकडून इतर देशांना भारतात हस्तक्षेपाचे आमंत्रण
भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांची घणाघाती टीका
19-Mar-2023
Total Views | 100
71
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. परदेशात जाऊन ते तेथील देशांना भारतात हस्तक्षेपाचे आमंत्रण देत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याची घणाघाती टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे.
नड्डा म्हणाले, ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांना लोकशाहीत स्थान नाही,’ असे त्यांनी ’नॅशनल युथ पार्लमेंट’च्या उद्घाटनानंतर व्हर्च्युअल भाषणात सांगितले. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी राहुल गांधी परकीय शक्तींना चिथावणी देत असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, काँग्रेस आज मानसिक दिवाळखोरीने ग्रस्त आहे. राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाही मूल्यांबद्दल लज्जास्पद वक्तव्य करून केवळ देशाचा अपमान केला नाही तर इतर देशांनाही आपल्या देशात हस्तक्षेप करण्याचे आमंत्रणच दिले आहे. राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, सर्वस्तरातून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.