स्वरा भास्कर च्या रिसेप्शन मध्ये राहुल गांधी

    17-Mar-2023
Total Views |
swara bhaskar 
 
मुंबई : समाजमध्यमांवर नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या लग्नाला कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थिती लावल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. नुकतेच स्वराने आपल्या न्यायालयात केलेल्या लग्नाचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर तिने मराठमोळ्या पद्धतीने लग्न केले व खास आमंत्रितांसाठी तसेच निकटवर्तीयांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. यावेळी या सोहळ्याला राहुल गांधींनी उपस्थिती लावली होती. राहुल गांधींचे वधू वरांसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.
 
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत स्वरा भाकर राहुल यांच्यासोबत चालताना दिसली होती, त्यामुळे स्वराच्या लग्नात राहुल यांचे दिसणे ही काही मोठी गोष्ट नव्हती.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.