नाट्यप्रयोगातून समाजसेवा ; अलबत्या गलबत्या चा विशेष प्रयोग

    14-Mar-2023
Total Views |

albatya 
 
मुंबई : अलबत्या गलबत्या ह्या नाटकाचा प्रयोग आपल्या तिकिटातून विद्याताई पटवर्धन यांच्यासाठी निधी संकलनाचे कार्य करत आहे. बालमोहन विदयामंदिर शाळेच्या विद्याताई पटवर्धन या एका दुर्धर आजाराशी लढत देत आहेत. अशात त्यांना आर्थिक साहाय्य म्हणून या प्रयोगाचे आयोजन केले आहे.
 
बालमोहन विदयामंदिर शाळेत बालरंगभूमीवर विशेष योगदान विद्याताईंनी दिले. आजवर रसिक प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि प्रतिसाद ह्या बालनाट्याला मिळाला. "त्यांच्या माध्यमातून या मनोरंजन क्षेत्राला अनेक नामवंत कलाकार मिळाले. विद्याताईंनी आपलं संपूर्ण आयुष्य बालनाट्यासाठी अर्पण केलं. आज त्या एकट्या एका दुर्धर आजाराशी लढत आहेत. आम्ही त्यांचे सर्व विद्यार्थी त्यांच्या सोबत निश्चितपणे उभे आहोतच. पण त्यांच्या उपचारांत एक आधार म्हणून आमच्या सोबत अलबत्या गलबत्या ची संपूर्ण टिम एकत्रितपणे ह्या माध्यमातून छोटी मदत करू इच्छिते." अशी माहिती टीमकडून मिळाली.
 
ते पुढे म्हणाले, "येत्या १९ मार्च २०२३ रोजी शिवाजी मंदिर येथे दुपारी ४ वा. होणाऱ्या अलबत्या गलबत्या नाटकाच्या तिकिटविक्रीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी वैद्यकीय निधी उभा करणार आहोत. तरी या मदतीला हातभार लावण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती."
 
तिकिटासाठी संपर्क :Rahul Pawar +91 93246 99065
( अधिक माहितीसाठी संपर्क करा : Nilesh Divekar 097680 11223)
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.