मुख्यमंत्री शिंदेंवरील आक्षेपार्ह वक्तव्य भोवले!

ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

    11-Mar-2023
Total Views |
Sanjay Ghadigaonkar Offensive statement on Chief Minister Shinde

ठाणे
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाडीगावकर पूर्वी शिवसेना, काँग्रेस, भाजपनंतर नुकतेच ठाकरे गटात सामील झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्याविरोधातही नौपाडा आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
वागळे इस्टेट एका बांधकामावर घाडीगावकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनेनंतर शिवसेनेचे कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे समन्वयक एकनाथ भोईर, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख शैलेश कदम आणि माजी परिवहन सदस्य दशरथ यादव यांनी गुरुवारी रात्री उशिरा घाडीगावकरांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, दोन गटांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी घाडीगावकर यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.