रामदास कदमांना दणका! सख्ख्या भावावर ईडीची कारवाई, अनिल परब अडचणीत

    10-Mar-2023
Total Views | 196

Sadanand Kadam


रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम - File Photo



मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता खेड येथील साई रिसॉर्टमध्ये ईडीचे पथक दाखल झाले. त्यानंतर रामदास कदम यांचे सख्खे बंधू सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी आता मुंबईतील ईडी कार्यालयात होणार आहे. ईडी चौकशीसाठी सदानंद कदम यांना घेऊन जात असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणातील ही कारवाई आहे.

सकाळी ईडीचे पथक भरणे नाका येथील रिसॉर्टवर दाखल झाले. सदानंद कदम यांना चौकशीसाठी ताब्यात घेत असल्याची सूचना ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कदम यांच्याकडून विचारणा केली असता प्रार्थमिक चौकशीसाठी आपण ताब्यात घेत आहोत, अशी माहिती देण्यात आली आहे. कदम यांना मुंबईला हलवण्यात येणार असून त्यांना चौकशीनंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

"अब तेरा क्या होगा अनिल परब?"


दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर संशयाची सुई आहे. कदम यांनी परब यांच्याकडून कोट्यवधींच्या रक्कमेत रिसॉर्ट विकत घेतले होते. अनिल परब यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागल्यानंतर कदम यांच्या चौकशीसाठीही ईडीचे अधिकारी आग्रही होते. त्या संदर्भात वारंवार नोटीसा पाठविल्यानंतरही कदम यांनी उत्तर दिलेले नव्हते.
मात्र, अखेर कदम यांना आज ईडीतील अधिकाऱ्यांनी थेट गाठून चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सूचक प्रतिक्रीया दिली आहे. ईडीने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना ताब्यात घेतले, अब तेरा क्या होगा अनिल परब?, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121