चाऱ्यानंतर लालूंना महागात पडतोय जमिन घोटाळा

    10-Mar-2023
Total Views |
cbi-raids-on-the-premises-of-former-rjd-mla-abu-dojana-close-to-lalu-yadav

नवी दिल्ली: ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभर विविध ठिकाणी छापेमारी केली आहे.

चारा घोटाळ्यानंतर आता ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळा लालू प्रसाद यादव यांना चांगलाच महागात पडत आहे. या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या ईडीने शुक्रवारी दिल्ली, मुंबई, रांची आणि पाटणा आदी शहरांमध्ये विविधठ ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्या मुलींच्या घरांसह दिल्लीतील यादव कुटुंबाच्या विविध १५ ठिकाणावर छापेमारी केली. त्याचप्रमाणे लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे माजी आमदार आणि बांधकाम व्यावसायिक अबू दोजाना यांच्या पाटणा येथील निवासस्थानीदेखील ईडीने छापेमारी केली आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीतील निवासस्थानीदेखील ईडीने छापा टाकला आहे. यावेळी ईडीच्या पथकाने लालू यादव यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121