'द रेल्वे मेन'वेब मालिका जगभरात ३६ देशांत ट्रेडिंगमध्ये

    02-Dec-2023
Total Views | 33

the railway man 
 
मुंबई : सध्या सत्य घटनांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत. नुकतीच नेटफ्लिक्स या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झालेली 'द रेल्वे मॅन' ही वेब मालिका केवळ भारतातच नाही तर जगभरात ट्रेडिंगमध्ये आहे. जगातील ३६ देशांमध्ये ही वेब मालिका पाहिली जात असून या मालिकेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेवर बेतलेल्या 'द रेल्वे मेन' या अस्वस्थ करणाऱ्या वेब मालिकेने जगभरात डंका वाजवला आहे.
 
काय आहे कथानक?
 
'द रेल्वे मेन' ही सत्य घटनेवर आधारित वेब मालिका आहे. १९८४ साली भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. या दुर्घटनेत १५ हजारांपेक्षा अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती होती हे सर्व काही या वेब मालिकेत दाखवण्यात आले असून नेटफ्लिक्सवर ही मालिका १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाली होती. दरम्यान, इतकी वर्ष या दुर्घटनेला लोटून गेली असली तरी त्याचे शारिरीक आणि मानसिक परिणाम आजही तेथील नागरिक भोगत आहेत. आजही तिथे जन्माला येणाऱ्या काही मुलांमध्ये व्यंग आहेत.
 
आणखी वाचा
 
 
महत्वाची बाब म्हणजे द रेल्वे मॅन ही नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंटअंतर्गत निर्मिती करण्यात आलेली ही पहिलीच वेब मालिका आहे. या चित्रपटात के.के. मेनन, आर माधवन, बाबील खान आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121