मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळायला हवे : मनोज जरांगे पाटील

    18-Nov-2023
Total Views |
 
Manoj Jarange Patil
 
 
मुंबई : २४ डिसेंबरपर्यंत आपली कसोटी आहे. २४ तारखेला सरकार आरक्षण देणार परंतू नाही तर आपण आहोतच. परंतू शांततेने काम करायचं. अर्धे मंत्रिमंडळ कामाला लागलंय, आपल्याला आरक्षण १०० टक्के मिळणार आहे. मराठा ओबीसीतच येणार दुसरीकडे आम्ही आरक्षण घेणार. ज्या जातीच्या पुरावे सापडले आमच्यात येऊ नका का म्हणताय? आम्ही ओबीसीत आहोत. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे आज सातारा दौऱ्यावर आहेत.
 
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मराठ्यांचे आरक्षण १८०५ पासून होते. जर मराठ्यांचे पुरावे होते तर ७० वर्षे कोणी लपवून ठेवले? याचे आता उत्तर पाहिजे. ज्यावेळी आरक्षणासाठी समिती नेमली. त्या-त्यावेळी मराठ्यांना आरक्षण नाही, असे सांगण्यात आले. आता पुरावा सापडू लागल्यावर मराठ्यांचे आरक्षण दबावामुळे लपवून ठेवले हे स्पष्ट झाले आहे. ते का लपवून ठेवले याचे उत्तर मिळाल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. आपल्या मायबापाने काबाडकष्ट करुन पोरांना शिकवले. परंतु ना बापाचे, ना पोराचे स्वप्न पूर्ण झाले. आरक्षण नसल्याने स्वप्नांची राखरांगोळी झाली, आयुष्य उद्ध्वस्त झाले."
 
"आमचं आरक्षण असताना दिलं नाही, मराठ्यांना दोन अंग आहे. मराठा क्षत्रिय आहे, लढतो आणि शेतीही करतो. मराठ्यांना आरक्षण मिळू दिले नाही. यांनी यांच्या बुडा खाली पुरावे लपवून ठेवले. त्यावेळी पुरावे नाहीत असं सांगितले मग आता कसे सापडले. सत्तर वर्षांपासून नुकसान केले आहे. आमचें सत्तर वर्षांचा बॅगलॉग कसा भरुन काढणार ते सांगा." असं जरांगे पाटील म्हणाले.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.