राज्यात सुरू असलेलं राजकारण मी पहिल्यांदा पाहतोय : शरद पवार
16-Nov-2023
Total Views | 60
मुंबई : राज्यात सुरू असलेलं राजकारण मी पहिल्यांदा पाहतोय. सध्या सुरु असलेले राजकारण कधी पाहीलेले नाही. पंतप्रधान मोदी जेथे जातील तेथे मोदी विरोधात असलेल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना पवारांनी मराठा आरक्षण आणि राज्यातील जागावाटपाबद्दल महत्वाचं वक्तव्यं केलं.
शरद पवार म्हणाले, "पाच राज्यात निवडणूका सुरू आहेत. मोदी विरोधात असलेल्या मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्वरुपातील हल्ले करत आहेत. सध्या सुरू असलेलं राजकारण कुठे पाहिेलेलं नाही. भाजप विरोधात येणाऱ्या बाकीच्या पक्षांना आम्ही एकत्र करू आणि त्यांना कसं स्थान देता येईल याचीही चर्चा करू. जागावाटापासंदर्भात दिवाळीनंतर चर्चा होणार. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) आणि काँग्रेस एकत्र येऊन आम्ही निवडणूका लढवू आणि जिंकू. मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचा आहे." असं शरद पवार म्हणाले आहेत.