Newsclickसाठी कोट्यवधी दान करणाऱ्या चीन समर्थक उद्योगपतीला EDचं समन्स
16-Nov-2023
Total Views |
नवी दिल्ली : 'न्यूजक्लिक' या वृत्तसंस्थेने चीनकडून आर्थिक मदत घेतल्याप्रकरणी अमेरिकन उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीने समन्स बजावले आहेत. याप्रकरणी न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना याआधीच ईडीकडून अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
नेव्हिल रॉय सिंघम हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीशी (सीसीपी) संबंधित आहेत. जगभरात चिनी प्रचार प्रसार करण्यासाठी ते निधी पुरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेविल रॉय सिंघमची संपत्ती कोट्यवधींची असून त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले आहे.
त्यांच्याविरुद्ध आता मनी लाँडरिंग प्रकरणी समन्स जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयामार्फत त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नेव्हिल रॉय सिंघम यांना चौकशीकरिता हजर राहण्यासाठी यापूर्वीच समन्स बजावण्यात आले होते.
तसेच सीबीआयने याप्रकरणी २ महिन्यांपूर्वी गुन्हाही दाखल केला आहे. न्यूजक्लिक आणि नेव्हिल रॉय सिंघम यांच्यावर परदेशी योगदान नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी 'न्यूजक्लिक'चे एचआर प्रमुख अमित चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली असून आता नेव्हिल रॉय सिंघम यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.