मुंबई : अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. गेली अनेक वर्ष मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका नाना पाटेकर यांनी साकारत आहेत. सध्या नाना वाराणसीत त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत आहेत. या चित्रिकरणादरम्यानचा नानांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक फॅन नाना पाटकेर यांच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आला असता नानांनी त्यांचा डोक्यात मारलेले दिसत आहे.
समाज माध्यमावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये शूटिंगदरम्यान एका छोटा चाहता नाना पाटेकरांबरोबर सेल्फी काढायला येत असल्याचे दिसत आहे. पण, सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याच्या डोक्यात नाना पाटेकर रागाच्या भरात जोरात मारल्याचे व्हिडिओत दिसते. नानांच्या या वर्तनुकीमुळे त्यांच्यावर समाज माध्यमावर टीका केली जात आहे.