“जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार”, ‘झिम्मा २’ चा ट्रेलर आला भेटीला
13-Nov-2023
Total Views | 67
1
मुंबई : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या ‘झिम्मा’ चित्रपटाने करोना काळानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणले होते. २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या झिम्मा चित्रपटाला सर्व वयोगयातील प्रेक्षकांना उदंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता ३ वर्षांनंतर पुन्हा ६ मैत्रिणी धम्माल-मज्जा दुप्पट करण्यासाठी घेऊल आल्या आहेत ‘झिम्मा २’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. झिम्माच्या या ताफ्यात नव्याने दोन अभिनेत्री सामील झाल्या असून त्यांचाही नवा आणि मनासा भिडणारा प्रवास प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
‘झिम्मा २’मध्ये सर्व मैत्रिणी इंदू यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमल्या आहेत. त्यांचा या रियुनियनमध्ये काय काय घडणार हे पाहण्यासाठी आता उत्सुकता लागली आहे. दरम्यान, ट्रिपसाठी निघालेल्या या सात जणींचा म्होरक्या कबीर अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दुप्पट आनंद घेऊन आला आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला प्रेक्षकांना अभिनेत्री निर्मिती सावंत गाडी चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर निर्मिती आणि सुचित्राला एक पोलीस अधिकारी पकडतो आणि बायकांचा नवा आणि मजेशीर खेळ सुरू होतो.
‘झिम्मा २’ च्या कथानकासोबत यातील संवाद देखील प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधुन घेतो. “फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं बाळा…”, किंवा, “बाबा गेल्यावर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी कधीच विचार केला नाही.”, “जोपर्यंत जिवात जीव आहे तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार!” तर अशा मनाला थेट भिडणाऱ्या आणि विचार करण्यास बाग पाडणाऱ्या संवादांवरुन चित्रपट किती अफलातून असेल याची चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. 'झिम्मा २' मध्ये, सुहाश जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी ‘झिम्मा २’ प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी ‘झिम्मा २’ प्रदर्शित होणार आहे.