बार्टीच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती!

    24-Jan-2023
Total Views |
मुंबई : राज्य सरकारकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे(बार्टी)च्या महासंचालक धम्मज्योती‎ गजभिये यांची सोमवारी‎ तडकाफडकी बदली करण्यात‎ आली आहे. धम्मज्योती गजभिये हे 20 सप्टेंबर 2021 रोजी बार्टीच्या महासंचालकपदावर रुजू झाले होते. कार्यमुक्तीचे आदेश‎ सोमवारी देण्यात आले होते. बार्टीच्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 
Sunil Vare
 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून याबाबत प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच‎ वारे यांना तत्काळ पदभार‎ स्वीकारण्याचे आदेश देण्यात‎ आले आहे.
 
 
आणखी बातम्या :
 
24 January, 2023 | 19:0
24 January, 2023 | 19:0
 
24 January, 2023 | 19:1
 
 
उच्च न्यायालयात याचिका दाखल...
 
राज्य सरकारच्या बार्टी संस्थेद्वारे प्रशिक्षण संस्थांना‎ दिलेल्या कंत्राटविषयी अकोल्यातून‎ तक्रार करण्यात आली होती. स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी‎ अकोला, बुलडाणा व अमरावती‎ येथील तीन संस्थांना‎ कंत्राट दिले होते. या तीनही संस्था‎ अकोल्यातील प्रा. संतोष कुटे‎ यांच्या आहेत. तसेच बार्टीकडे‎ सादर करण्यात आलेल्या‎ कागदपत्रांमध्ये तीनही ठिकाणचे‎ शिक्षक व विद्यार्थी एकच‎ असल्यानं ही शासनाची फसवणूक‎ आहे असा आरोप‎ प्रा.‎ चंदू सिरसाट यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.