संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार

    26-Sep-2022
Total Views | 70

movie
 
 
लग्न जुळवताना ‘३६ गुण’ जुळतात का हे पाहिले जाते. दोघांमध्ये वाद किंवा भांडण असेल तर तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असंही म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.
 
 
तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार असून येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह बंधनात अडकलेले, सुधीर आणि क्रिया लग्नानंतर लंडनला फिरण्यास जाण्याचे ठरवतात. परंतु तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची जाणीव होते आणि यावरच ‘३६ गुण’ चित्रपट भाष्य करतो. आजची पिढी त्यांची विचारधारा याचे अतिशय समर्पक चित्रण हा चित्रपट करतो. संतोष आणि पूर्वा यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.
 
‘द प्रॊडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फ़िल्म्स’ निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखील रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. तसेच या चित्रपटाला मंगेश कांगणे यांचे गीत तर अजित परब यांचे संगीत लाभले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तृणभक्षी प्राण्यांसाठी विशेष प्रकल्प; गवताचे पुनरुज्जीवन

बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये तृणभक्षी प्राण्यांसाठी विशेष प्रकल्प; गवताचे पुनरुज्जीवन

'विवेक पार्क फाऊंडेशन'ने (वीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार दि १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले (grassland development program). यावेळी एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेक्नाॅलाॅजिजचे सह-संस्थापक व संचालक संदीप परब हे देखील उपस्थित असेल (grassland development program). या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याची संधी मिळाल्यास ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121