राऊत दहावीत दोनदा नापास झाले होते!

    05-Aug-2022
Total Views |
NIlesh 

मुंबई: विनायक राऊत दहावी नापास आहेत, त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असे माजी खासदार निलेश राणे म्हणाले.या बाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. माजी मंत्री उदय सामंत यांचावर झालेल्या हल्ल्याबदल विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना निलेश राणे म्हणाले की, या दहावी नापास माणसाने आम्हाला कायदा शिकवू नये.
 
 
"मोठ्या तावातावाने हा माणूस कायदा शिकवू लागला आहे, दहावी नापास माणसांनी जर कायदा शिकवायचं ठरवलं तर महाराष्ट्र संकटात येईल. ३०७ कलम कसं लागू होतं हा प्रश्न तुम्ही कसा विचारू शकता? उद्धव ठाकरेंचे सरकार असताना, तुम्ही किती लोकांवर ३०७ कलम लावले? किती तडीपारी केली हे आम्हाला चांगलच माहिती आहे," असे निलेश राणे म्हणाले. सायबर गुन्ह्या अंतर्गत किती मुलांना तुम्ही त्रास दिलात, विसरलात का? त्यांच्या पालकांना दिवस भर बसवून ठेवलं, तेव्हा नाही का आठवलं कलम ३०७. भाजपच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस तयार करायला उद्धव ठाकरे स्वतः पोलीस स्टेशनला फोन करायचे, तुमची नाटकं महाराष्ट्राने पाहिली आहेत. सीसीटीव्ही मध्ये सगळं साफ दिसतंय, त्यामुळे कारवाई मध्ये तुम्ही ढवळाढवळ करू नका, असे निलेश राणे म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.