घाऊक किंमत निर्देशांक १३.५६ टक्क्यांवर

कांद्यांच्या किंमतीत घट

    दिनांक  14-Jan-2022 19:26:11
|
onion

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्याचा घाऊक किंमत निर्देशांक १३.५६ टक्क्यांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो १४.२३ टक्के इतका होता. दरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून हा दर १० टक्क्यांपेक्षा वरच आहे. भाजीपाल्यांच्या किंमतींत ३१.५६ टक्के आहेत. नोव्हेंबरमध्ये त्या ३.९१ टक्क्यांवर पोहोचल्या होत्या. एका महिन्यांतील ही आठ पट भाववाढ आहे. ब्लूमबर्गने नोव्हेंबरमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, तीन दशकांमध्ये १९९१नंतर पहिल्यांदाच महागाई दर वृद्धी दाखवित आहे. कच्चे तेल, धातू , रसायने आणि खाद्य पदार्थांसह कापड यांच्या किंमतींचा महागाईवर परिणाम होतो.

 
केंद्र सरकार जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कांद्याच्या किंमती नोव्हेंबरच्या तुलनेत घटल्याचे दिसून येत आहे. कांद्याच्या किंमती ३०.१० टक्क्यांनी घसरुन डिसेंबरमध्ये १९.०८ टक्क्यांवर पोहोचल्या आहेत. बटाट्याच्या घाऊक किंमतीत घसरण नोंदविण्यात आली आहे. वीज आणि इंधनाच्या क्षेत्राचा विचार केल्यास नोव्हेंबरच्या तुलनेत घसरण नोंदविण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये ही आकडेवारी ३९.८१ टक्के होती. डिसेंबरमध्ये ती ३२.३० टक्क्यांपर्यंत घसरली आहे.खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ
खाद्यपदार्थांच्या किंमतीत ६.७० टक्क्यांनी वाढ होऊन ९.२४ टक्के इथकी वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वृद्धींगत झालेला महागाईचा आकडा १० टक्क्यांवरच आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर १४.२३ टक्क्यांवर पोहोचला होता. किरकोळ महागाईमुळेही जनता त्रस्त आहे. बुधवारी याबद्दलची आकडेवारी जाहीर करण्यात आली. जी डिसेंबरमध्ये ५.५९ टक्क्यांनी ही वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये हा आकडा ४.९१ टक्के इतका होता.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.