वसा समाजकार्य अन् विकासाचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
Rajendra _1  H


मार्च-एप्रिल २०२० मध्ये राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव झाला. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येत माणुसकीचा नवा अध्याय जगासमोर ठेवला. भारताने आज बहुतांशी कोरोनाची लढाई जिंकली, असं म्हणता येईल. अशा गंभीर परिस्थितीतही गरजूंना मदतकार्याबरोबरच आपल्या प्रभागातील विकासकामेही अविरतपणे करणार्‍या बदलापूर (प)च्या नगरसेवक राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
 
 
राजेंद्र घोरपडे हे बदलापूरमधील विकासकामांसाठी सुपरिचित नाव. घोरपडे कित्येक वर्षांपासून धडाडीने लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करत होते. सामाजिक कार्याचा वसा जपत असतानाच, २००५ साली त्यांनी बदलापूर पश्चिममधून नगरपालिकेची निवडणूक लढविली. सामाजिक कार्याची ओढ आणि नागरिकांच्या प्रश्नांप्रति त्यांची असणारी जाण याच्या जोरावर ते २००५ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. २००५ साली सुरू झालेला हा प्रवास आजतागायत सुरु आहे. जनतेने त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवत बदलापूरमध्ये अधिकाधिक विकासकामे करण्याचा धडाकाच लावला आहे. आमदार आणि खासदाराच्या अखत्यारित येणारी विकासकामे त्यांनी नगरसेवक पदावर असतानाच करून दाखविली.
 
 
‘कोविड’ काळातही घोरपडे यांनी मोठे काम उभारले. मात्र, या काळात गरीब आणि गरजू नागरिकांच्या परिस्थितीचा कुठेही गैरफायदा त्यांनी घेतला नाही. मदतकार्य करतानाचे फोटो सोशल मीडिया किंवा अन्य कुठेही शेअर करायचे नाही, याबाबत सक्त ताकीद घोरपडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली होती. ते म्हणतात, “जेव्हा एखाद्या वस्तीत, कुटुंबात किंवा व्यक्तीला आपण अन्नधान्य वाटप करतोय, ते गरजू आहेत म्हणून आपण फोटो काढून आम्ही त्यांना मदत केली, हे सांगणे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांना याबाबत सक्त ताकीद दिली होती.” हे मदतकार्य करण्यासाठी घोरपडे यांनी स्वतः ३० ते ३५ लाख इतका खर्च केला. या पैशातून अन्नधान्य, मेडिकल किट, सॅनिटायझर, वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍यांना पीपीई किट व अन्य अत्यावश्यक साधनांचे मोफत वाटप केले. ५०० ते ५५० लोकांना दररोज दोनवेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. हे कार्य अविरतपणे दोन्ही लाटेदरम्यान सुरु होते.
 
 
या काळात सर्वात मोठे आव्हान होते ते नागरिकांना बेड उपलब्ध करून देणे, ‘व्हेंटिलेटर’ उपलब्ध करून देणे, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनचा पुरवठा कुठे उपलब्ध आहे ते पाहणे, अशातच दुसर्‍या लाटेत अचानक ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. अशावेळी या आव्हानांवर मात करत, या समस्यांवर कसा तोडगा काढता येईल, यावर घोरपडे यांनी भर दिला. नियोजन करताना आपल्या नगरसेवक, नगराध्यक्ष या पदाचा वापर करून जे जे शक्य होतं, ते सर्व करण्याचा प्रयत्न राहिल्याचे ते सांगतात. यात डॉक्टरांशी संपर्क साधणे, ‘कोविड’ रुग्णांसोबत संपर्कात राहून ‘कोविड सेंटर’मध्ये त्यांना योग्य उपचार मिळतात का, यावर घोरपडेंनी भर दिला. जेव्हा दुसरी लाट आली तेव्हा विषाणूच्या संसर्गाचा वेग अधिक होता. संसर्ग होताच पुढच्या दोन ते तीन दिवसांत तो शरीराला कमकुवत करत होता. रुग्णाचे नातेवाईक घोरपडेंशी संपर्क साधायचे.
 
 
 
हतबल होऊन रडायचे की, ‘काहीही करून आम्हाला बेड उपलब्ध करून द्या.’ तेव्हा मात्र मुंबईतील मोठी रुग्णालये, जसे की, नानावटी, फोर्टिस या रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्याचे काम युद्धपातळीवर घोरपडेंच्या माध्यमातून करण्यात आले. बर्‍याचदा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नसायच्या. तेव्हा स्वतःच्या वाहनातून ‘कोविड’ रुग्णांना मुंबईतील दाखल करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. याचा परिणाम असा झाला की, ज्यावेळेस घोरपडे एखाद्या सोसायटीमध्ये तिथल्या ‘कोविड’ परिस्थितीची माहिती घेण्यासाठी जायचे, तेव्हा जे रुग्ण आजारातून बरे होऊन घरी परतले होते ते अक्षरशः येऊन पाया पडायचे की, ‘तुमच्यामुळे आज आमचे प्राण वाचले आहेत.’ म्हणूनच वेळेवर मदत देत असंख्य लोकांचे प्राण वाचविण्याचे भाग्य आम्हाला लाभले, याचे समाधान असल्याचे राजेंद्र घोरपडे सांगतात.
 
 

Rajendra _2  H

‘राजेंद्र घोरपडे प्रतिष्ठान’, ‘साईश्याम देवस्थान’ हे मंदिर ट्रस्ट आणि ‘विजय क्रीडा मंडळ’ अशा तीनही संस्थांचे मिळून १५० ते २०० कार्यकर्ते घोरपडे यांच्यासोबत या मदतकार्यात उतरले होते. ज्यावेळेस नागरिक घराबाहेर पडू शकत नव्हते, अशावेळी गरजूंना घरोघरी जाऊन या कार्यकर्त्यांनी मदत पोहोचवली. बदलापूर पश्चिम सानेवाडी, हेंद्रेपाडा, बॅरेज रोड, गणेशनगर, सर्वोदयनगर, मांजर्ली आणि बेलवली याभागात घोरपडेंच्या माध्यमातून मदतकार्य पोहोचविण्यात येत होते. या मदतकार्यात प्रवीण चौधरी, संजय राऊत, राजा पाटील, बाबासाहेब चौघुले, दीपक भंडारी, उमेश पटेल, दिनू पटेल यांसारखे असंख्य कार्यकर्ते रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची बाजी लावून मदतकार्यात उतरले होते.
 
 
यावेळचा एक हृदयस्पर्शी अनुभव सांगताना घोरपडे म्हणतात, “हाजीमलंग पट्टीमध्ये एक गाव आहे. त्या गावातील साधारणतः ३२ वर्षीय तरुण रुग्णाला बेड मिळत नव्हता. त्याच्या पत्नीला कुठूनतरी माझा नंबर मिळाला. रात्री १२ वाजता त्या महिलेने माझ्याशी संपर्क साधला. तिच्या पतीला कोणत्याही रुग्णालयात दाखल करून घेतले जात नव्हते. म्हणून ती शेवटी नवर्‍याला तशाच अवस्थेत गाडीमध्ये घेऊन माझ्या घरी आली. तिने घराच्या गेटवर येऊन मला फोन केला. मी पाहिले तर तिचा नवरा अत्यंत गंभीर परिस्थितीत होता. काहीही ओळख नाही, आमची परिचय नाही. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिला कोणीतरी सांगितलं की, “तू घोरपडेंकडे जा, तुला ते मदत करतीलच.” हा नागरिकांचा विश्वास होता. तेव्हा मी त्यांना आशीर्वाद रुग्णालयात घेऊन गेलो. तिथे दोन तास कशीतरी उपचाराची सोय करून दिली. त्या दोन तासांत महानगरपालिकेच्या ‘कोविड सेंटर’मध्ये नवी खाट टाकून उपचाराची चोख व्यवस्था झाल्याची खातरजमा केली. बरोबर दोन तासांनी त्या रुग्णावर उपचार झाले आणि दहा दिवसांत तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. गंभीर अवस्थेत असलेल्या त्या तरुणाचे प्राण वेळेवर उपचार मिळाल्यामुळे वाचले, हा प्रसंग मला आयुष्यभर लक्षात राहील,” असे घोरपडे सांगतात.
 
 
या काळात केवळ सामाजिक कार्याचाच नाही, तर विकासकामाचादेखील धडाकाच घोरपडे यांनी लावला होता. बदलापूर शहरासाठी विकासाचे नवे मॉडेल घोरपडे यांनी उभारले आहे. यात पाच एकरात भव्य क्रिकेट मैदान, भव्य आर्ट गॅलरी, ११० फूट उंचीचा राष्ट्रवज, ‘युपीएससी’ आणि ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय आणि ‘सीए सेंटर’, इतकेच नाही, तर जपानी ‘मियावाकी’ पद्धतीची आधुनिक दोन ते तीन उद्यानं, भव्य असा जिमखाना अशी अनेक कामं कोरोना काळात प्रभागात घोरपडे यांनी उभारली. त्यांच्या या सामाजिक कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

@@AUTHORINFO_V1@@