हिंदूविरोधी दंगलीतले परकीय हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2021
Total Views |

delhi riots_1  
 
 
दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीत परक्या देशात राहून कुकृत्ये करणार्‍या संघटनेचा हात असल्याचे समोर आले आणि त्या संघटनेवर बंदीची कारवाईही करण्यात आली. त्या संघटनेचे नाव ‘अन्सार इंटरनॅशनल’ आणि बंदी घालणारा देश आहे जर्मनी.
 
 
स्वतःला ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवून घेणारे हिंदू २०२० साली दिल्लीत उसळलेल्या भीषण हिंदूविरोधी दंगलींना कधी विसरू शकत नाही आणि कितीही काहीही झाले तरी ते विसरायलाही नको. कारण, संसदेने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर बुरख्यावाल्या अम्मीजान, खालाजान, फुफाजान तब्बल तीन महिने इतरांना त्रास देत एकाच जागेवर आंदोलनाला बसल्या आणि त्यातून उत्पन्न झालेल्या विखारानेच दिल्लीत हिंदूविरोधी रक्तपात घडवला. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशातील धार्मिक अत्याचारग्रस्त हिंदू व अन्य अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याच्या विरोधात धर्मांध मुस्लिमांकडून दिल्लीत ठिकठिकाणी दगडफेक, जाळपोळ, लुटालूट, मारहाण केली गेली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादेत स्वागत करत असताना ट्रम्प यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी इस्लामी कट्टरपंथीयांनी सुमारे तीन दिवस दिल्लीत हिंसेचे थैमान घातले आणि त्यात ५० निर्दोष व्यक्तींचा बळी गेला, तर २५०पेक्षा अधिक जण जखमी झाले. मात्र, त्यावेळीदेखील दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीत फक्त भारतातील धर्मांध शक्तींचा नव्हे, तर परदेशातील कट्टरपंथी संस्था, संघटनांचा सहभाग असल्याचे हिंदुत्वनिष्ठ गटाकडून सातत्याने सांगितले जात होते, तर धर्मांध मुस्लिमांची दाढी कुरवाळण्यालाही खरीखुरी धर्मनिरपेक्षता मानणार्‍या टोळक्याने ते नाकारले व हिंदूंवरच उलटे आरोप सुरू केले. पण, आता मात्र, दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीत परक्या देशात राहून कुकृत्ये करणार्‍या संघटनेचा हात असल्याचे समोर आले आणि त्या संघटनेवर बंदीची कारवाईही करण्यात आली. त्या संघटनेचे नाव ‘अन्सार इंटरनॅशनल’ आणि बंदी घालणारा देश आहे जर्मनी.
 
 
जर्मनीच्या डुसेलडॉर्फमध्ये ‘अन्सार इंटरनॅशनल’चे कार्यालय होते व इथूनच ही संघटना आपल्या ठिकठिकाणच्या काळ्या कारवायांसाठी काम करत असे. त्यावरच जर्मनीने बंदी घातली व जर्मनीचे गृहमंत्री हॉर्स्ट सीहोफर यांनी ‘अन्सार इंटरनॅशनल’ची असलियत सर्वांसमोर सांगितली. ‘अन्सार इंटरनॅशनल’ जगभरातील इस्लामच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी किंवा देणग्या देत असे. पण, ते खोटेच होते. त्या सढळ हस्ते केल्या जाणार्‍या मदतीमागे कुटील कारस्थानी कुविचार कार्यरत होता आणि त्यांनी दिलेल्या देणग्या इस्लामच्या चांगल्यासाठी नव्हे, तर जगभरात इस्लामी दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरल्या जात असत. ‘अन्सार इंटरनॅशनल’ने अशाप्रकारे सीरियासह विविध देशांतील इस्लामी दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केली. दिल्लीत उद्भवलेल्या हिंदूविरोधी दंगलीसाठीही ‘अन्सार इंटरनॅशनल’ने निधी गोळा केला होता. पण, तो निधी फक्त आणि फक्त मुस्लिमांसाठी, प्रामुख्याने दंगलीत सामील झालेल्यांसाठीच जमवला होता. अर्थातच, ‘अन्सार इंटरनॅशनल’ने दहशतवादी संघटना किंवा दिल्लीतील दंगलीत कट्टरपंथीयांना मदत करण्यासाठी जर्मनीचाच आपला अड्डा म्हणून वापर केला. जर्मनीतूनच वेगवेगळ्या मार्गाने धर्माच्या आधारावर जीव घेणार्‍यांपर्यंत मदत पोहोचवली. त्याचीच माहिती जर्मनीच्या गृहमंत्रालयाला मिळाली व संघटनेची मानवताविरोधी कृत्ये पाहता ‘अन्सार इंटरनॅशनल’वर बंदी घातली. त्यामागे ‘अन्सार इंटरनॅशनल’चे धर्मांध दहशतवादी संघटनांना मदत करण्याचे कारण होते, तसेच आणखीही एक कारण होते. ते म्हणजे, जर्मनीला दहशतवादाची प्रयोगशाळा होऊ न देणे. युरोपातील विविध ख्रिश्चनबहुल व उदारवादाचा कंड असलेल्या देशांनी आपल्या इथे इस्लामी देशांतील घुसखोरांना आश्रय दिला आणि नंतर ते त्यांच्यावरच उलटले. स्वीडननेदेखील माणुसकीच्या नावाखाली निर्वासित मुस्लिमांना आसरा दिला आणि आज त्या देशाची स्थिती विचित्र झालेली आहे. इस्लामी दहशतवादाची प्रयोगशाळा म्हणून स्वीडनचे नाव आता घेतले जात असून, तशी अवस्था आपली होऊ नये, असे जर्मनीला वाटते. आपल्या जमिनीचा वापर कट्टरपंथीय दहशतवादासाठी होऊ नये, यासाठी जर्मनी मागील काही महिन्यांपासून पावले उचलत आहे आणि आताची ‘अन्सार इंटरनॅशनल’वरील कारवाई त्यातलाच एक भाग आहे.
 
 
दरम्यान, जर्मनीतील डुसेलडॉर्फमध्ये कार्यालय उभारून ‘अन्सार इंटरनॅशनल’ला अन्य देशांसह भारतातील दंगलीला आर्थिक रसद पुरवठा करण्याची गरज का भासली? तर त्याचे उत्तर नक्कीच इस्लामी उम्मा किंवा इस्लामी विश्वबंधुत्वातच मिळते. इथला, तिथला, जगातला कुठलाही मुस्लीम दुसर्‍या मुस्लिमाचा बांधव आहे आणि त्याला आपण सहकार्य केले पाहिजे आणि त्याच्या लढ्याला, मग तो भलेही अन्य मानवी समुदायाच्या दृष्टीने चुकीचा, अयोग्य असो, आपण मदत केली पाहिजे, याच भावनेने ‘अन्सार इंटरनॅशनल’ने दिल्लीतील हिंदूविरोधी दंगलीत धर्मांध मुस्लिमांना मदत केली. तसेच यातून आणखी एक मुद्दा स्पष्ट होतो की, देशातील कट्टरपंथीय पिलावळीचे हात फक्त पाकिस्तानपर्यंतच नाही, तर अन्य देशांतील धर्मांधांपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्हीकडच्या कट्टरपंथीय ताकदी हातात हात मिळवून भारताला आणि इथल्या हिंदूंना नेस्तनाबूत करण्यासाठी टपलेल्या आहेत. त्यासाठी दिल्लीसारखी दंगल त्यांनी घडवून दाखवली, नंतर बंगळुरूमध्येही तोच पॅटर्न वापरला गेला. आणखी कुठे कुठे अशा घटना घडत असतात. मालदा, भैंसा, मुझफ्फरपूर वगैरे वगैरे. देशाबाहेरून कारवाया करणार्‍या अनेक संघटनांपैकी आज एका ‘अन्सार इंटरनॅशनल’वर बंदी घातली गेली. पण, इतरांचे काय? ‘अन्सार इंटरनॅशनल’व्यतिरिक्त इतरही अनेक संघटना छुप्या पद्धतीने इस्लामी दहशतवाद्यांना मदतीचेच काम करत असतात. समोरून येऊन हल्ला करणार्‍या दहशतवादी संघटनांपेक्षा आपले खरे रूप दडवून काम करणार्‍या या संघटना अधिक धोकादायक समजल्या पाहिजेत. कारण, त्यांच्या चेहर्‍यावर चांगुलपणाचा मुखवटा असतो नि आत कपट. देशातील बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोर मुस्लिमांची बाजू घेत त्यांचा कळवळा दाटून येणार्‍यांचा यात समावेश करावा लागेल. तथापि, ते आपला घुसखोरांना देशात वसवण्याचा धंदा कधीच बंद करणार नाहीत. पण, त्यावर उपाय म्हणून राष्ट्रवादी शक्तींनी एकजूट दाखवणे, हाय पर्याय असू शकतो.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@