१५ मे नंतर राज्यात लॉकडाऊन वाढणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021
Total Views |

lockdown_1  H x


मुंबई
: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यांनतर पुन्हा १५ मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. या लॉकडाऊनचा फायदा राज्याला होताना दिसत असून, १५ मे नंतर आणखी काही दिवस राज्यातील लॉकडाऊन वाढवावा, असा एक सूर ठाकरे सरकारमध्ये आहे. ठाकरे सरकार यावर विचार करत असून, येत्या मंत्रिमंडळात यावर विचार आणि सर्वांची मते जाणून घेतल्यावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहेत.
 
मुंबई सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होताना पहायला मिळत आहे. पण असे असताना ग्रामीण भागातील वाढणारी रुग्णसंख्या मात्र सरकारची डोकेदुखी ठरत आहे. आज राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी फक्त १२ जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट कमी होत आहे. इतर जिल्ह्यांत मात्र अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याने, आता काही जिल्ह्यामंध्ये स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यालाही हवा तसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत नाही. त्याचमुळे जर ग्रामीण भागातील ही कोरोनाची साखळी तोडायची असेल, तर आणखी काही दिवस तरी संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावावाच लागेल, असे काही जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांचे म्हणणे आहे.
@@AUTHORINFO_V1@@