नितीश राणा, अक्षर पटेलसह वानखेडेवरील कर्मचारीही कोरोना बाधित

    दिनांक  03-Apr-2021 15:51:31
|

IPL 2021_1  H x
नवी दिल्ली : आयपीएल २०२१ची सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच खेळाडूंनाही कोरोनाची लागण होण्याचा बातम्या येण्यास सुरुवात झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा प्रमुख खेळाडू नितीश राणा हा कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्यानंतर, शनिवारी वानखेडे स्टेडियमवर काम करणाऱ्या ८ मैदान कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. आता दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख गोलंदाज अक्षर पटेललाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी देण्यात येत आहे.
 
 
 
वानखेडे स्टेडियमवरील मैदानावरील ८ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. मागच्या आठवड्यात १९ मैदान कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ३ जणांचा कोरोना रिपोर्ट सुरुवातीला पॉझिटिव्ह आला होता आणि १ एप्रिलला अन्य पाच जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२१चे नियोजन बदलणार का? बीसीसीआय आयोजनाबातीत काय निर्णय घेणार? याबबत लवकरच स्पष्ट होईल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.