ममता दिदींचं ठिक! पण बाकीच्यांनी का घातलंय हेल्मेट ?

    दिनांक  26-Feb-2021 18:43:56
|

mamata didi_1  पहा, डझनभर सुरक्षारक्षक कसा दीदींचा तोल सावरत आहेत!
पश्चिम बंगाल:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आणि यावेळी त्या चर्चेत आहेत कारण, नुकताच ममता दीदींचा एक व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. ज्या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचे हेल्मेट घालून इलेक्ट्रिक स्कूटर चालवत त्या आपला तोल सावरण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. आणि जवळपास डझनभर सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले.
 
 


 
 
खरंतर, आगामी विधानसभा निवडणुकांमुळे प. बंगालचे राजकीय वातावरण तापले आहे. सगळेच राजकीय पक्ष आपापल्या परीने उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशातच, गुरुवार दि. २५ फेब्रुवारी रोजी ममता बॅनर्जी यांनी देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्याचा अनोख्या मार्गाने निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांनी इलेक्ट्रिक स्कूटी चालवत आणि गळ्यात इंधनवाढीवर भाष्य करणारी पाटी अडकवत मुख्यमंत्री कार्यालय गाठले.
 


 


ममता बॅनर्जी स्कूटर चालवण्याच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कर्मचारी त्यांना कसे हाताळत आहेत हे पाहून अनेकांनी त्यावर विनोदी शब्दात भाष्य केले आहे. खरंतर ममता दीदी त्यांचा तोल सावरण्याचा अतोनात प्रयत्न करत असल्या, तरी त्यांना काही ते साधलेलं दिसत नाही. आणि त्यामुळेच अगदी लहान मुलाला त्याचे पालक जसे सायकल धरून ती ढकलत नेत असतात आणि ते मुलंही मीच सायकल चालवतोय अशा अविर्भावात नुसते बसून असतात, तशाच पद्धतीने दीदींचे सुरक्षा रक्षकही स्कूटरला हात पकडत आणि तोल सावरत ती पुढे ढकलण्यास मदत करताना दिसत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.