'आरे'मध्ये फुटबाॅलने खेळताना दिसले बिबट्याचे पिल्लू; आदित्य ठाकरे म्हणतात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2021
Total Views |

leopard _1  H x


आरे जंगल म्हणून घोषित करण्यात आलंय 

मुंबई (प्रतिनिधी) - गोरेगावच्या आरे वसाहतीमध्ये बिबट्याचे पिल्लू फुटबाॅलने खेळत असल्याचे फोटो वन्यजीवप्रेमींनी टिपले. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे फोटो टि्व्ट करुन आरेला जंगलाचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आरेसारख्या परिसराला मानवी अतिक्रमणापासून संरक्षित केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धन्यवाद म्हटलंय. 
 
 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेचा प्रश्न मार्गी लावला. आरेमधील मेट्रो-3 चे कारशेड त्यांनी कांजुरमार्गला हलवले. त्यानंतर आरेमध्ये राखीव वनक्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामाध्यमातून आरेमधील 800 एकरचे क्षेत्र राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. आरेमध्ये बिबट्यांचा अधिवास आहे. त्यामुळे याठिकाणी वरचेवर बिबट्यांचा वावर आढळून येतो. अशाच प्रकारे काल सायंकाळी आरेमध्ये बिबट्याचे एक पिल्लू फुटबाॅलने खेळत होते आणि दुसरे पिल्लू दगडामागे लपून खेळणाऱ्या बिबट्याकडे पाहत होते. या पिल्लांची छायाचित्रे वन्यजीवप्रेमी कुणाल चौधरी यांनी टिपली. 
 
 


चौधरी यांनी टिपलेली छायाचित्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टि्व्ट केली होती. या टि्व्टखाली त्यांनी म्हटलं आहे की, "या प्रकारामुळेच आरेला मानवी अतिक्रमणापासून संरक्षित करण्यात आले आहे. आरेला वनचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदारजी आणि वनमंत्री संजय राठोडजी यांचे मी आभार मानतो." आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच आदित्य ठाकरे आघाडीवर होते. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातही आरेमध्ये कारशेड न होता त्या परिसराला जंगलाचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली होती.

@@AUTHORINFO_V1@@