'शिवरायांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मानासाठी माझे रक्तही द्यायला तयार'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2020
Total Views |

kangana ranout_1 &nb
मुंबई : आज सकाळी कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून चंढिगड एअरपोर्टसाठी रवाना झाली आहे. दुपारी ती चंढिगडहून मुंबईसाठी फ्लाईटने येणार आहे. दरम्यान,आजच्या सामनाच्या 'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेने कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे. याचा कंगनानेही समाचार घेतला आहे.


कंगना रानौतने ट्विटवरुन पुन्हा एकदा शिवसेनेवर नाव न घेता प्रहार केला आहे. कंगना म्हणते, मी वयाच्या १२ वर्षी हिमाचलसोडून चंढिगड येथे हॉस्टेलला गेली. तिथून दिल्लीत आली त्यानंतर १६ व्या वर्षी मुंबईत आली. काही मित्रांनी सांगितले मुंबईत तोच राहतो ज्याला मुंबादेवी ठेवते. आम्ही सगळे मुंबादेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सर्व मित्र परतले पण मुंबादेवीने मला तिच्या जवळच ठेवले असे म्हणत तिने सामनातील अग्रलेखाला प्रत्युत्तर दिले आहे.तसेच मुंबईत माझे घर आहे. महाराष्ट्राने मला सगळं काही दिले हे मला मान्यच आहे. पण मीदेखील महाराष्ट्राला माझ्या भक्ती आणि प्रेमाने एक मुलगी म्हणून भेट दिली आहे. जी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत स्त्री सन्मान आणि अस्मितेसाठी स्वत:चं रक्तही द्यायला तयार आहे, जय महाराष्ट्र असेही कंगना म्हणते.
@@AUTHORINFO_V1@@