विषप्रयोग केल्याने सुशांतचे शवविच्छेदन उशिरा : सुब्रमण्यम स्वामी

    25-Aug-2020
Total Views | 163
sushant_1  H x


सुशांत आत्महत्या प्रकरणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा!


मुंबई : सुशांतचे शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्याच्या पलिकडे विरघळले. जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे, असे ट्वीट भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. सुशांतवर विषप्रयोग झाल्याने त्याची ऑटोप्सी जाणीवपूर्वक उशिरा केली, असा खळबळजनक दावा भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.


एकीकडे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाला वेग आलेला असतानाच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतवर विषप्रयोग झाल्याने त्याची ऑटोप्सी जाणीवपूर्वक उशिरा केली, असा दावा स्वामींनी केला. तसेच आता याला जबाबदार असलेल्यांची कठोर चौकशी करण्यात यावी असेही त्यांनी म्हंटले आहे.







“आता मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्याच्या पलिकडे विरघळतील. जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे” असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121