पुणे, नांदेडमध्ये पुन्हा लॉकडाऊन वाढवले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |

Pune_1  H x W:
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. घोषणा केल्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस हा लॉकडाऊन असणार आहे. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती दिली आहे.
 
 
नांदेड जिल्ह्यात १२ जुलै पासून संचारबंदी लागू केली जात आहे. १२ जुलैच्या मध्यरात्री पासून २० जुलै २०२० पर्यंत ही संचारबंदी लागू राहील असे आदेश जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शुक्रवारी काढले आहेत. या दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यात देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संचारबंदी लागू केली जात असली तरीही सरकारी आणि अत्यावश्यक सेवांना ठराविक वेळेसाठी सूट दिली जाणार आहे.
 
 
अनलॉकच्या दरम्यान कंटेनमेंट झोन वगळता पुण्यातील काही भागात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. मात्र, करोनाचा धोका हा दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची संख्याही जास्त आहे. अनेक लोक हे मास्क न वापरता फिरत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हा संसर्ग टाळता यावा यासाठी पुण्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.
 
 
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या सोमवारपासून म्हणजे १३ जुलैपासून पुढचे १५ दिवस लॉकडाउन असणार आहे. पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@